आज होणारी म्हाडाची परीक्षा ही अपरिहार्य कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आली होती. या पुढील परीक्षा ही म्हाडा स्वतः घेणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. परिक्षार्थ्यांकडून परीक्षेसाठी आकारलेले शुल्क हे म्हाडाकडून परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढे म्हाडातर्फे होणाऱ्या परीक्षेसाठी कुठलीही फी आकारली जाणार नसल्याचे देखील आव्हाड म्हणाले.